११ नोव्हेंबर ला भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाची जिल्हा स्तरीय बैठक
कार्यकर्त्यानी उपस्थीत रहावे. जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांचे आवाहन
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली/ दि.८ नोव्हे.
अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे गडचिरोली जिल्ह्यातील दहा तालुक्यात काम सुरु असुन अण्णा हजारे यांच्या आंदोलनातुन तयार झालेले ग्रामसभा, माहितीचे अधिकार, दप्तर दिरंगाई व अन्य जनहितार्थ असलेल्या कायद्याची जनतेमध्ये जागरुकता निर्माण व्हावी व प्रशासनातील मनमानी तथा नियमबाह्य कारभार यावर अंकुश ठेवणे, येणा-या काळात लोकायुक्त व जनलोकपाल कायदा तयार होण्या करीता अण्णा हजारे यांचे राज्यव्यापी आंदोलन होणार असुन विविध सामाजीक संघटना व जनतेने आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविण्या करीता शहरी भागापासुन तर ग्रामीण भागा पर्यंत जनजागृती करण्यासाठी ११ नोव्हेंबरला भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाची जिल्हा स्तरीय बैठक केली आहे.
या बैठकीत शेतक-यांना न्याय मिळावा या करीता भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन शेतकरी व बेरोजगार युवक, युवतीच्या बाजुने संघर्ष करणे. शासन, प्रशासनात पारदर्शता येण्या करीता जेष्ट समाजसेवक अण्णा हजारेंच्या विचारानुसार बैठकी मध्ये कार्यकर्त्याना योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. या करीता राज्य समिती विश्वस्त डाॅ. शिवनाथजी कुंभारे तसेच विदर्भातील चंद्रपुर, नागपूर, गोंदीया येथील जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. सदर बैठक शुक्रवार दिनांक 11/11/2022 ला दुपारी 12.00 वाजता चंद्रपुर रोड वरील सर्कीट हाऊसला भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे. जिल्हाभरातील सर्व तालुक्यातुन जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यानी उपस्थीत राहण्याचे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केले आहे.