आपला जिल्हा

चंद्रपूरात १०० फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा २५ लक्ष रुपयांचा निधी

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि ०५ ऑगस्ट

देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करत असताना स्वातंत्र्यासाठी बलीदान देणा-या स्वातंत्र्य सैनिकांचेही स्मरण केले पाहिजे. त्यासाठी येत्या १५ ऑगस्टला प्रत्येक घरी तिरंगा लागला पाहिजे असे आवाहन करत चंद्रपुरात १०० फूट उंचीचा राष्ट्रध्वज लागावा यासाठी नियोजन केले असुन त्यासाठी जिल्हाधिकारी यांना आमदार निधीतून २५ लक्ष रुपयांचा निधी दिला असुन यातुन चंद्रपूर येथे १०० तर घुग्घूस येथे ७५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उप्रकमाबाबत जनजागृती करण्यासाठी क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि नेहरु युवा केंद्र या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की तिरंगा हा देशाची शान आहे. संपुर्ण देश वासियांना तिरंग्याप्रती आदर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यंदा हर घर तिरंगा हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चंद्रपुरातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑगस्टला चंद्रपुरातील प्रत्येक घरी तिरंगा लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलुन दाखविला. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात येणा-या घुग्घूस आणि चंद्रपूर येथे सदर उंचीचा राष्ट्रध्वज कायमस्वरुपी लहरत राहावा याकरिता आमदार निधीतून २५ लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळता केला आहे. या निधीतून राष्ट्रध्वज ऊभारण्यासह महापुरुषांचे भिंत शिल्प उभारण्यात येणार असल्याचे जोरगेवार यावेळी म्हणाले.
आमदार किशोर जोरगेवार आणि उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दिल्या नंतर जिल्हा क्रिडा संकुल बॅडमिंटन सभागृहाच्या द्वारापासुन सदर सायकल रॅलीला सुरुवात झाली. रॅली अभियानाबाबत जनजागृती करत शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली. या रॅलीत सायकल क्लब, क्रिडा मंडळे, नागरिक, शासकीय निमशासकीय कार्यालयीन कर्मचारी आदींनी सहभाग घेतला होता.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!