आपला जिल्हा
गडचिरोली जिल्ह्यात ९ कोरोना बाधित तर ७ कोरोनामुक्त
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २८ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यात रविवारी ४०९ कोरोना तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९ कोरोना बाधित आढळून आले. तर ७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ८४ झाली आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित ३८१३४ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३७२७३ आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७७७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.२२ टक्के तर मृत्यू दर २.०४ टक्के झाला आहे.
कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली १, अहेरी २, चामोर्शी १, कोरची १ व कुरखेडा २ जणाचा समावेश आहे. तर नविन बाधितामध्ये गडचिरोली १, चामोर्शी १, मुलचेरा ६, कुरखेडा १ जणाचा समावेश आहे.