आपला जिल्हा
अँड. कविता मोहरकर सन्मानित

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २५ ऑगस्ट
गडचिरोली येथील विधिज्ञ आणि सौंदर्यशासाच्या अभ्यासक अँड. कविता मोहरकर यांना नागपूर येथील एका तारांकित हॉटेलमध्ये नुकतेच झालेल्या कॅटवॉकर्स फॅशन एक्स्पोमध्ये सपोर्टिव्ह पार्टनरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फॅशन एक्पोचे मुख्य आयोजक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स विलियम (कोची) यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने पूर्वा बारई, शुभांगी झाडे, डॉ. बारई, जयश्री नायर, हिना आंबेकर, ज्योती पार्मल आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. कॅटवॉकर्सचा हा नागपुरात पार पडलेला पहिलाच फॅशन शो होता. यावेळी देशातील नामवंत फॅशन डिझायनर, फोटोग्राफर्स व कोरिओग्राफर्स तसेच मॉडेल्स उपस्थित होत्या.