खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात भाजपने काढली तिरंगा रॅली

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १४ ऑगस्ट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. अशोक नेते यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली.
कारगिल चौकातून तिरंगा बाईक रॅली आणि रथयात्रेचा शुभारंभ भारत मातेच्या जयघोषाने सुरु करण्यात आला, खा अशोक नेते हे स्वतः मोटारसायकल वर स्वार होऊन रॅलीत सहभागी झाले होते. सुमारे तिनशे नागरिक मोटारसायकलद्वारे या रॅलीत सहभागी झाले होते. घराघरावर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी यावेळी केले.
या रॅलीत भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या रेखा डोळस, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.