केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचे गडचिरोलीत जेलभरो तर चंद्रपुरात काळी फिती लावून आंदोलन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०५ ऑगस्ट
वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच जीवनावश्यक वस्तूंवर मोदी सरकारने लादलेली जीएसटी विरोधात कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी गडचिरोलीत जेलभरो तर चंद्रपूरात काळी फिती लावून आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
गडचिरोलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढी, जीवनावश्यक वस्तूवरील वाढलेल्या जीएसटी मुळे सामान्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. सतत आलेल्या अतिपावसामुळे जमिनी खरडून गेलेल्या असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी, पीककर्ज माफ करावे, पूरबाधित क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करण्यात यावे इत्यादी मागण्या या आंदोलनातून करण्यात आली. त्यानंतर सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जेल भरो आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. पेंटाजी तलांडी, व पंकज गुडेवार डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, भावना वानखेडे, मनोहर पा. पोरेटी, हसनअली गिलानी, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामन सावसाकडे, रोजगार स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस तालुका कॉंग्रेसच्या वतीने स्थानिक गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील पूरबाधित भागाची पाहणी करून नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, पीककर्ज माफ करावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयाची मदत करण्यात यावे, खरडून गेलेल्या व गाळ लागलेल्या शेत जमिनीच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात आले. यावेळी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे, कॉंग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, शोभा ठाकरे, महिला शहर अध्यक्ष विजया बंडीवार तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.