पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०३ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यात हाहाकार माजविलेल्या मुसळधार पावसाने आठवडाभर उसंत घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी गडचिरोलीत पावसाने हजेरी लावली. आठवडाभरात उकाड्यातही प्रचंड वाढ झाल्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रोवणी झालेल्या पिकांना याचा फायदा होणार आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने जिकडे-तिकडे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले असून, अनेकांच्या शेतजमिनी खरडून निघाल्या आहेत. अशातच आठवडाभरापासून पावसाने उसंत घेतली. या कालावधीत रोवणीच्या कामाला वेग आला. मात्र, उकाड्याने नागरिकांना त्रस्त केले होते. आज संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गडचिरोलीत हलका पावसाने हजेरी लावली. यामुळे रोवणी झालेल्या पिकांना याचा फायदा होणार असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.