पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३१ जुलै
घरी झोपून असलेल्या ११ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील एकलपुर येथे घडली. आशिष कालिदास दुफारे असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने गावात एकच खळबळ माजली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृतक आशिष हा गावातीलच जिल्हा परिषद शाळेत ५ व्या वर्गात शिकत होता. सकाळी ५ वाजताच्या सुमारास तो आपल्या घरात खाटेवर झोपुन होता. मण्यार जातीच्या विषारी सापाने त्याला दंश केले. यात त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ माजली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.