पोलिसांच्या सतर्कतेने २१ कासवांना जीवनदान

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३१ जुलै
सिरोंचा पोलिसांची एक पथक गस्तीवर असतांना त्यांना बसस्थानक परिसरात एका मोठ्या प्लास्टिकमध्ये २१ कासव आढळून आले. त्या कासवाच्या तोंडात आकडे लटकून होते. वनविभागाच्या सहाय्याने त्या कासवांच्या तोंडातील आकडे काढून रविवारी प्राणहिता नदीत सोडून प्राण वाचविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांचे गस्तीपथक गस्तीवर असतांना शनिवारी एक चुंगडी संशयितरित्या पडून असल्याचे दिसून आले. गस्तीपथकाने चुंगडीची पाहणी केली असता त्यात तोंडात आकडे लटकलेले जिवंत २१ कासव आढळून आले. सदर कासवांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वनपरिक्षेत्र व त्यांच्या चमूने प्रथम श्रेणी पशुअधिकारी डॉ. चेतन पेद्दापेल्ली यांचे कडे नेले व सर्व कासवांच्या तोंडातील आकडे काढून उपचार करण्यात आला. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, क्षेत्र सहाय्यक ए.एच.गहाणे, लिपिक अनिल पस्पुलवार, वनरक्षक आर.वाय. तलांडी, आर.एल. आत्राम, डी.जी.भुरसे, राकेश वासेकर, वाहनचालक समीर शेख, चंद्रशेखर जाकावार, राजु ओदेला, महेश मादरबोईना, शंकर नडीगोटा यांच्या उपस्थितीत सदर कासवांना सुखरूपपणे प्राणहिता नदीमध्ये सोडुन जीवनदान दिले.