पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २७ जुलै
गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी ८२८ कोरोना तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १० कोरोनबाधित आढळून आले. तर ८ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४९ झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नविन बधीतांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २, अहेरी तालुक्यातील २, आरमोरी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, मुलचेरा तालुक्यातील २, कोरची तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २, मुलचेरा तालुक्यातील ४ व कुरखेडा तालुक्यातील २ जणाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ७७५ जणांचा बळी घेतला आहे. एकूण ३७ हजार ६९२ जणांना कोरोनाने ग्रासले, त्यापैकी ३६ हजार १८७० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.