आपला जिल्हा
जिल्ह्यात १५ कोरोनाबाधित तर ६ कोरोनामुक्त
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २३ जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील४९३ कोरोना तपासण्यांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यात१५ कोरोन बाधित आढळून आले. तर ६ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ५१ झाली आहे. जिल्ह्यातील ३७६७९ कोरोन बाधितांपैकी ३६८५३ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ७७५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.१४ टक्के तर मृत्यू दर २.०६ टक्के झाला आहे.
नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ६, अहेरी १, आरमोरी १, चामोर्शी ५, धानोरा १ व कुरखेडा तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३, धानोरा तालुक्यातील १ व कुरखेडा तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे.