पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि २२ जुलै
चंद्रपूर शहरातील भवानजीभाई चव्हाण हायस्कूल मधील शिक्षकाने दोन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अभिजीत रागीट या शिक्षकाला गुरुवाटी अटक केली आहे.
वर्षभरापूर्वी भवानजीभाई चव्हाण हायस्कूल मधील दोन शिक्षकांनी एका वसतिगृहात राहात असलेल्या शाळेच्याच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा असाच प्रकार उघडकीस आला आहे.
अभिजीत रागीट हा शिक्षक इयत्ता दहावीला शिकवित असून त्याने दहावीतील दोन आदिवासी विद्यार्थिनींना धमकी देवून त्यांचा विनयभंग केला. त्या विद्यार्थिनींनी झालेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितले असता पालकांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अभिजीत रागीटविरुद्ध पोक्सो तसेच अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.