विनयभंग करणाऱ्या आरोपीस ५ वर्षाच्या शिक्षेसह ५ हजाराचा दंड
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि १६ जुलै
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायाधीश अनुराग दीक्षित यांनी पाच वर्ष कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मधुकर आत्राम रा.रामाळ, ता. सिंदेवाही असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सिंदेवाही पोलीस स्टेशन परिसरात आपल्या मैत्रिणीसोबत खेळत असतांना आरोपीने सदर अल्पवयीन मुलीला घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात पिडीत व तिची आईने सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली. उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी तपास करून पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. सदर प्रकरणात साक्षीदार व योग्य पुराव्याच्या आधारे सत्र न्यायाधीश अनुराग दीक्षित यांनी आरोपीस ५ वर्षाची शिक्षा व ५००० रु. दंड ठोठावला. दंड न भरल्यास एका वर्षाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील स्वाती देशपांडे आणि कोर्ट पैरवी पोलीस हवालदार मनोहर उरादपहारे यांनी काम पाहिले.