
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १४ जुलै
नागपूर वरून धानोरा जात असलेल्या भरधाव ट्रॅव्हल्सची झाडाला धडक बसली. यात कंडक्टर जखमी झाला. ही घटना बुधवारी उशिरा गडचिरोली-धानोरा मार्गावर घडली.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली येथील एमएच-४९-टी-१५८१ क्रमांकाची साई ट्रॅव्हल धानोरा मार्गे नागपूर जात असत व रात्री धानोरा परत येते. बुधवारी रात्री परत येत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला जोरदार धडक बसली. यामध्ये ट्रॅव्हल्स मधील कंडक्टर जखमी झाला असून सुदैवाने बसमध्ये प्रवाशी नसल्याने जिवितहानी टळली. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे धानोरा-गडचिरोली मार्गावरील रहदारी ठप्प पडली होती. सकाळी झाड तोडून मार्ग खुला करण्यात आला.