पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि २२ जुलै
सततच्या नापीकीमुळे व कर्जबाजारीमुळे एका युवकाने शेततलावात उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील नांदगांव येथे शुक्रवारी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. सदाशिव प्रकाश भंडारे (२९) रा. नांदगांव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मूल तालुक्यातील नांदगांव येथील मनोहर भंडारे नांदगांव शेतशिवारात शेती आहे. सदर शेती त्यांचे नातु सदाशिव भंडारे हा करीत होता. शेती करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बचत गटाकडुन कर्ज घेतले होते. त्यांनी शेतात धान आणि कापसाची लागवड केली होती. मात्र संततधार पावसामुळे तीनवेळा पऱ्हाटीची लागवड करुनही काहीही फायदा होत नसल्याने मागील काही दिवसापासुन तो आर्थिक विवंचनेत होता. दरम्यान शुक्रवारी जगदीश मोहुर्ले यांच्या शेतातील शेत तलावात उडी घेवुन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
सावली तालुक्यात आढळला मृतदेह
सावली तालुक्यातील सावली तुकुम ते सिंगापूर मार्गावर एका मृतदेह आढळून आला. मृतक भैयाजी विठ्ठलराव कुसराम हा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मोहरली मार्कंडा येथील रहिवासी आहे.
घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार आशिष बोरकर घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतक व्यक्तीच्या तोंडातून फेस निघत असल्याने सदर व्यक्ती हा विषारी औषध पिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र गावापासून दूर त्याचा मृतदेह आढळून आल्याने ही हत्या की आत्महत्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.