पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि १५ जुलै
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना शुक्रवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या अलिझंजा जंगल परिसरात घडली. गुराख्या सह त्या वाघाने एका बैलाला ठार केले तर दुसरा बैल जखमी झाला आहे. सीताराम ननावरे रा. अलिझंजा असे गुराख्याचे नाव आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या बाह्मणगाव, टेकेपार व अलिझंजा येथील गावकरी जळावू लाकडे गोळा करण्यासाठी व गुरे चारण्यासाठी जंगलात जात असतात. शुक्रवारी सकाळी सीताराम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या अलिझंजा जंगलात गुरे चारण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या वाघाने सीतारामसह त्यांच्या बैलावर सुद्धा हल्ला चढविला. यात एका बैलाचा मृत्यू झाला तर दुसरा बैल जखमी झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.