आपला जिल्हा

गोंडवाना विद्यापीठाकरीता सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया रद्द

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १७ ऑगस्ट

गोंडवाना विद्यापीठातील कुलसचिव यांचे करिता गडचिरोली जवळील अडपल्ली येथील ६४.८० हेक्टर आर. खाजगी जमिन भुमि संपादन पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कायदयानुसार भुसंपादन करण्याबाबतची कार्यवाही गडचिरोली येथील विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरु आहे. जिल्हाधिकारी यांनी गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करीता अडपल्ली येथील खाजगी जमिनीची विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली यांच्या कार्यालयाच्या स्तरावर उक्त कायदयानूसार सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया उक्त कायदयाचे कलम 93 अन्वये रद्द केलेली आहे.

विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली यांच्या कार्यालयाच्या स्तरावर गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करीता उक्त कायदयानूसार सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,गडचिरोली दर्शन निकाळजे यांनी कळविले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!