गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीची मैदानी चाचणी ६ ते ८ सप्टेंबर रोजी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २५ ऑगस्ट
गडचिरोली जिल्हा पोलिस भरती-२०२२ मधील शारीरिक चाचणी करिता पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी ५, ६, व ७ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून नवीन तारखेनुसार ६, ७ व ८ सप्टेंबर रोजी पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याबाबत सूचना व पात्र उमेदवारांचे बैठक क्रमांक गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उमेदवारांनी आपल्या तरीखेनुसार सकाळी साडे ४ वाजता पोलीस मुख्यालयातील एम.टी मेन गेट वर यावे ५ वाजताच्या नंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच उमेदवारांनी शारीरिक चाचणीसाठी जातांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र, ५ पासपोर्ट साईज फोटो, तसेच पाण्याची बॉटल, अल्पोपहार घेऊन जावे. यांसह जन्मदाखल, टीसी किंवा बोनाफाईड, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, जात वैधता प्रमाणपत्र, एमएससीआयटी प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड/[मतदान कार्ड तसेच पोलीस भरती संदर्भात इतर कागदपत्र घेऊन यावे, असे पोलीस विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. उमेदवारांनी निळी बॉल पेन सोबत ठेवावे असे सूचना देण्यात आले आहेत.