पोवार समाजाचे प्रेरणास्तोत्र डॉ. धनपाल टेंभरे यांचे निधन
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १२ ऑगस्ट
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ग्राम मोखे येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेले डॉक्टर धनपाल जयपाल टेंभरे यांचा वृद्धापकाळाने वयाच्या ८७ व्या वर्षी शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता निधन झाले.
बालपणापासून आर एस एस जनसंघाचे ते सदस्य होते. १९५३-१९५५ मध्ये गोंदिया संघ शाखेचे प्रमुख होते. त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषद ब्रह्मपुरी जिल्ह्याचे १५ वर्षे अध्यक्ष व विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताचे उपाध्यक्ष होते. गोंदिया, भंडारा जिल्ह्यातून पोवार समाजाचे गणित विषयाचे पहिले पीएचडी धारक होते. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे अनेक शोध प्रबंध अमेरिका जपान इटली व भारतामध्ये प्रसिद्ध झाले होते.
नागपूर विद्यापीठाच्या अनेक समित्यांचे अध्यक्ष त्याचप्रमाणे गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य इत्यादी पदावर त्यांनी कार्य केले होते. ते पंधरा वर्षे गणिताचे प्राध्यापक व १८ वर्षे नागपूर विद्यापीठातील नामांकित हितकारणी कॉलेज ब्रह्मपुरी येथे प्राचार्य पदावर कार्य केले. भारतीय किसान संघ व अखिल भारतीय मुनी समाज प्रांतीय अध्यक्ष होते. सामाजिक व राजनैतिक क्षेत्रात सुद्धा सक्रिय होते. अशा या पवार समाजातील अष्टपैलू व्यक्तिमत्वाला शतशः नमन व भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांची अंतिम यात्रा शनिवारी यशोदा नगर येथून सकाळी १० वाजता अंबाझरी घाट, नागपूर येथे संपन्न होईल.