उद्या पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ जुलै
गडचिरोली जिल्ह्यात मागील दहा दिवस अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावात पाणी शिरले. यात घरांचे, शेती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील या नुकसानीची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून ही समिती उद्या २३ जुलै व २४ जुलै या दोन दिवसात जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी तालुक्यातील पूरग्रस्त व नुकसान झालेल्या क्षेत्राला भेट देऊन पाहणी करणार आहे.
या समितीत माजी आमदार अविनाश वारजूरकर, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव शिवा राव, प्रदेश सचिव संदीप गडमवार यांची निवड करण्यात आली असून या दौऱ्यात माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश महासचिव तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आम.आनंदराव गेडाम, माजी आम.पेंटाराम तलांडी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते सह जिल्ह्यातील सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते तालुका अध्यक्ष सह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली.