वाहनासह ४ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३१ जुलै
चंद्रपूर जिल्ह्यातून चामोर्शी मा-र्गे गडचिरोली येथे अवैधरित्या दारू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत ४ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी पहाटेच्या सुमारास चामोर्शी पोलिसांनी केली. अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू आणून विक्री केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून चारचाकी वाहनातून रविवारी दारू तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी बसस्थानकाजवळ सापळा रचला. पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन क्र. एमएच ३४ एए ५०१६ येताना दिसले. वाहनाला थांबवून चौकशी केली असता त्यात रॉयल स्टाग सह १ लाख २२ हजार रुपयाचा दारूसाठा आढळून आला. दारू व तस्करीसाठी वापरण्यात आलेली ३ लाख किमतीची चारचाकी वाहन असा एकूण ४ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंधाराचा फायदा घेत वाहन चालक फरार झाला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरु आहे. ही कारवाई चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर साठे यांच्या चमूने केली.