आपला जिल्हा
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार उद्या गडचिरोलीत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २७ जुलै
महाराष्ट्र विधानसभेचे वि रोधी पक्षनेते अजित पवार उद्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पूर व अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. ते सकाळी गडचिरोली शासकीय विश्रामगृह येथे येणार असून पूरग्रस्त शेतकरी, पूरपीडित नागरिक तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेससह राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याची भेट घेऊन त्यांच्याकडून पूरपरिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पूर व अतिवृष्टीबाबत आढावा घेणार आहेत. त्यानंतर शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.