आपला जिल्हा

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील राज्य महामार्गासह १७ मार्ग बंद

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ११ ऑगस्ट

जिल्ह्यात कोसळलेला मुसळधार पाऊस आणि संजय सरोवर, गोसेखुर्द, मेडिगड्डा व अन्य धरणांचे पाणी सोडल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून गुरुवारी जिल्ह्यातील सिरोंचा-हैद्राबाद तथा सिरोंचा-जगदलपूर या तेलंगणा व छत्तीसगड राज्य महामार्गासह १७ मार्ग पुरामुळे बंद आहेत.

बंद मार्गांमध्ये आलापल्ली ताडगांव भामरागड (पर्लकोटा नदी, गुंडेनुर नाला, कुमरगुडा नाला, हेमलकसा नाला, कुडखेडी नाला, ताडगाव नाला, पेरमिली नाला), चातगांव कारवाफा पोटेगांव पावीमुरांडा घोट रस्ता (पोहार नदी पोटेगांव जवळ), सिरोंचा कालेश्वरम वारंगल हैद्राबाद रस्ता (गोदावरी नदीवरील मोठा पूल) , अहेरी बेजुरपल्ली परसेवाडा लंकाचेन रस्ता (लंकाचेन नाला ), गडचिरोली आरमोरी (पाल नदी गोगांवजवळ), निझमाबाद सिरोंचा जगदलपूर रस्ता (सोमनपल्ली नाला), गडचिरोली चामोर्शी (शिवनी नाला), आलापल्ली आष्टी गोंडपिपरी रस्ता (वैनगंगा नदी), कुरखेडा वैरागड रस्ता (सती नदी, मोहझरी लोकल नाला), अहेरी मोयाबीनपेठा वटरा रस्ता (वटरा नाला),भेंडाळा गणपूर बोरी अनखोडा रस्ता (हळदीमाला नाला, अनखोडा नाला ), वडसा कोकडी पिंपळ गाव अरतोंडी आंधळी रस्ता (आंधळी जवळ नाला ), मौसीखांब वडधा वैरागड शंकरपूर चोप कोरेगांव ते जिल्हा सिमेपर्यंतचा रस्ता (स्थानिक नाला), आष्टी आलापल्ली रस्ता (दिना नदी), अहेरी गडअहेरी देवलमारी रस्ता (गडअहेरी नाला), खरपूंडी दिभना बोधली रस्ता (लोकल नाला), चामोर्शी शंकरपूर हेटी मार्कंडा देव फराडा मोहोली रामाळा घारगाव दोडकुली हरणघाट (लोकल नाला) या मार्गाचा समावेश आहे.

चौथ्या दिवशी पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील अनेक दुकाने आणि घरे पाण्याखाली सापडली होती. मात्र, पर्लकोटाचा पूर आज दुपारपासून ओसरू लागला आहे. आरमोरी ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहू लागल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!