विशेष वृतान्त

जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थीनींचा मृत्यू प्रकरणात सहाय्यक प्रकल्प अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २१ ऑगस्ट 

जपतलाई येथील आश्रमशाळेतील ३ विद्यार्थीनींचा ९ ऑगस्ट च्या रात्री सर्पदंशांने मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कारवाईच्या रडारवर आले आहेत. शनिवारी उशीरा आदिवासी विकास विभागाने कारवाई करीत गडचिरोली एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या प्रभू सादमवार,
सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) व संतोष कन्नाके शिक्षण विस्तार अधिकारी या दोघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे.

यापूर्वी आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करणे आणि शाळेचे मुख्याध्यापक, महिला आणि पुरुष अधिक्षक यांचे सह कुपारलिंगो संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
मागील एक आठवड्यापासून नागपूर येथे आदिवासी विद्यार्थी संघाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. त्यात प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी होती. शनिवारी आदिवासी विद्यार्थी संघाच्या १६ पैकी १४ मागण्या आदिवासी विकास विभागाने मान्य केल्या. त्यात सहायक प्रकल्प अधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!