उद्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गडचिरोलीकरांचे गांधी चौकात धरणे आंदोलन
शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१९ जुलै
देशातील विद्यार्थ्यांच्या NEET परीक्षेतील गैर व्यवस्थापनाची निपक्ष चौकशी करण्याकरिता अशा विविध मुद्द्यावर वीस- बावीस दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचे उपोषण शांतता मार्गाने सुरू असताना. आरोग्याची समस्या सामोर करून, पोलिसांचा बडगा उगारुन, अन्याय मार्गाने सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विद्यार्थ्यावरील अन्यायकारक शैक्षणिक धोरणाचा निषेध, पारदर्शक न्याय आणि विद्यार्थ्यांना केंद्रीय परीक्षा व शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी हे आंदोलन सुरू असताना. सरकारने दडपशाहीचा वापर करून आंदोलन समाप्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी देशातील लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्या निषेधार्थ आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सुज्ञ नागरिक, युवा, विद्यार्थी उद्या दुपारी तीन वाजता गांधी चौक गडचिरोली येथे धरणे आंदोलन करणार आहेत.
या निमित्ताने सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, युवक-युवतींनो, शेतकरी बांधवांनो, कामगार बांधवांनो, विद्यार्थी मित्रांनो आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जागरूक नागरिकांनो, देशाच्या हितासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे. या प्रसंगी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या एकतेची आणि लोकशाहीवरील विश्वासाची ताकद दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही केवळ एका व्यक्तीची लढाई नाही. ही देशाच्या भविष्यासाठी, लोकशाही मूल्यांसाठी आणि जनतेच्या आवाजासाठी उभे राहण्याची वेळ आहे. चला, एकजुटीने पुढे येऊया. शांततेच्या मार्गाने आपला आवाज बुलंद करूया आणि सोनम वांगचुक यांच्या जनहिताच्या लढ्याला आपले नैतिक समर्थन देऊ या. आपली उपस्थिती हीच आपल्या एकतेची सर्वात मोठी ताकद आहे.
आवाहनकर्ता – आम्ही गडचिरोलीकर


