आंवान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन
श्री. गुरुदेव सेवा फाऊंडेशन व श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा संयुक्त उपक्रम

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ जून
आंवान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आंधळी ता. कुरखेडा जि. गडचिरोली, येथे शनिवारला श्री. गुरुदेव सेवा फाऊंडेशन व श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
शिबिरामध्ये निःशुल्क नेत्र तपासणी, रक्तदान, मधुमेह, स्त्रीरोग, कान, नाक, घसा, सिकलसेल, कॅन्सर, रक्तदाब, मोफत चष्मा वाटप, जनरल, मेडिसीन इत्यादी तपासण्या पार पडल्या.
सदर कार्यक्रमाचे उद्घाघटन उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्षप्रमुख तथा विशेष कार्यकारी उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबईचे मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे यांनी केले, अध्यक्षस्थानी पद्मश्री परशुराम खुणे होते तर डॉ. सुगत चंद्रिकापुरे संघटक भंडारा, गोंदिया जिल्हा शिवसेना, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली डॉ . माधुरी किलनाके ड उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा, डॉ अमित ठमके तालुका वैद्यकीय अधिकारी कुरखेडा सुजाता वाडीवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंगेश चिवटे साहेब म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. परंतु गडचिरोली जिल्हातील दुर्गम भागात शिबिर होत नव्हते. कृपाल मेश्राम यांचे सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य मोफत महा आरोग्य शिबिर महा रक्तदान शिबीर मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू व मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित केले गेले.
शिबिरात ५७० रुग्णांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले २२३ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले ४५ रुग्णामध्ये मोती बिंदू आढळुन आला त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया नागपूर येथील प्रसिद्ध महात्मे हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे मोती बिंदू रुग्णांची नागपूर ला जाणे येणे राहणे, जेवणाची व्कपाल मेश्राम अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे. २४ रक्त दात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या सर्व व्यक्तींना १० लक्ष रुपयांचे विमा कवच मोफत देण्यात आले व कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थीगण, पालक, नागरिक, शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्वांचे सहकार्य लाभले.