खा. अशोक नेते यांना तौलीक महासभा, आदिवासी, दलित संघटना, महाग्रामसभेचा पांठिबा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १६ एप्रिल
भाजपा महायुतीचे उमेदवार खा. अशोक नेते यांना महाराष्ट्र प्रांतिक तौलीक महासभा जिल्हा गडचिरोली, आदिवासी विद्यार्थी संघटना, महग्रामसभा, आदिवासी गोटुल समीती, सरपंच संघटना, कोयतुर गोंड समाज संघटना, गोंड-राजगोंड महासंघ, आदिवासी समाज संघ, बिरसामुंडा स्मारक समीती, क्रांतीवीर नारायणसींह उईके, बाबुराव मडावी संघर्ष समीती, विर बाबुराव शेडमाके संघर्ष समीती, राणी दुर्गावती महिला संघर्ष समीती, पंचशील बौद्ध संघटना, पावीमुरांडा क्षेत्रातील गांवातील इलाका ग्रामसभांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनविले. जनजाती गौरव दिवस घोषित केले. पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महु, दिल्ली, मुंबई येथे स्मारक बनविल, इंग्लंड चे घर विकत घेतले, एकंदरीत आदिवासी, दलितांना न्याय दिला म्हणून देशहित व विकासासाठी खा.अशोक नेते याना पांठिबा देत असल्याचे प्रतिपादन संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी केले.
सदर बैठकीत आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते अँड.मोहन पुराम, आदिवासी गोटुल समीती चे प्रकाश गेडाम, कोयतुर गोंड समीतीचे परसराम टेकाम, गोंड राजगोंड महासंघ विलास कन्नाके,आदिवासी समाज संघाचे खुशाल कुमरे, बिरसामुंडा स्मारक समीतीचे यशवंत सिडाम, क्रांतीवीर नारायणसींह उईके समीतीचे दादाजी टेकाम, वीर बाबुराव शेडमाके समीतीचे प्रवीण कोल्हे, राणी दुर्गावती समीतीच्या उषा पुराम, पंचशील बौध्द समाज संघटनेचे कैलास लोणारे, संजय चौधरी, पावीमुरांडा इलाक्यातील २२ गांवांचे अध्यक्ष तिरु.केसरी पाटील मट्टामी, तिरु.मधुकर कोवासे, तिरु. शत्रु पाटिल नरोटे, तिरु.बाबुराव पाटील झुरी, तिरुमती रंजना पांडे, तिरु.रमेश नरोटे, रामु हेडो, तिरुमती, कवीता आतला यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा चे उपाध्यक्ष डॉ. भारत खटी यांनी संबोधित केले.