विशेष वृतान्त

थोर समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे देहावसान

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २८ एप्रिल 

गडचिरोली जिल्ह्यातील थोर समाजसेवी व्यक्तिमत्व, विविध सामाजिक व धार्मिक , सांस्कृतिक संस्थाचे मार्गदर्शक, अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे माजी जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथजी कुंभारे (गडचिरोली) यांचे मंगळवारी दुपारी ११ वाजता वृध्दापकाळाने गडचिरोली येथे निवासस्थानी देहावसान झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. त्यांचे  पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता गडचिरोली येथे कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे कार्य प्रेरणेने अनेकांना दिशा मिळाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा परिवर्तनवादी व मानवतावादी विचार सर्वदूर जावा यासाठी त्यांनी अव्याहतपणे प्रयत्न केलेला आहे. कर्मयोगी श्री तुकारामजीदादा गीताचार्य अड्याळ टेकडी आणि पद्मश्री अण्णा हजारे (राळेगण सिद्धी) यांच्या सोबत अनेक वर्षे सेवेची कामे केलीत. दुर्गम, नक्षत्रग्रस्त आदिवासी दुर्लक्षीत भागात त्यांनी लोकसेवेच्या कामात स्वतःला झोकून दिले. अनेकांना आधार दिला. वैद्यकीय सेवेसोबत त्यांनी या लोक कल्याणकारी अभियानात आपल्या आयुष्याची सुमारे ५० वर्ष दिलीत.

गडचिरोली येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती, गडचिरोली सायकल स्नेही मंडळ, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती, झाडीबोली साहित्य मंडळ, गडचिरोली जिल्हा दारूबंदी कार्यात तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती आदी कार्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!