पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू
गडचिरोलीत मुलचेरा पोलीस ठाण्यात होते सेवारत जीव वाचवण्यासाठी पोलीसांनी केले अथक परिश्रम
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क | गडचिरोली १२ डिसेंबर
जिल्ह्यातील मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
रमेश बहिरेवार (वय ४३ वर्ष) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. रमेश बहिरेवार हे गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील ठाकरी येथील रहिवासी असून मुलचेरा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. पोलिस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या प्रयत्नाने त्यांना चॉपरच्या साहाय्याने काही मिनिटांतच नागपूरला नेण्यात आले. उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बहिरेवार यांना ९ डिसेंबर रोजी सकाळचे सुमारास अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. याची माहिती मिळताच मुलचेराचे ठाणेदार अशोक भापकर यांनी रमेश बहिरेवार यांना उपाचारासाठी मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून पुढील उपचारासाठी रेफर केले.पोलीस निरीक्षक गणेश कड आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून त्यांना त्वरित गडचिरोली येथे हलविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या वेदना पाहून ठाणेदार अशोक भापकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी संपर्क करून सविस्तर माहिती दिली. त्यांनी लगेच जिल्हा पोलीस दलासाठी असलेला चॉपर मुलचेराला पाठवण्याचा निर्णय घेतला. रुग्णालाऑक्सिजन लावून हेलिपॅडवर आणले. मात्र, छातीत दुखतअसल्याने त्या शिपायाला वेदना सहन होत नव्हत्या. अशातवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नागपूरपर्यंत रुग्णाला पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठीलागणारी औषधं आष्टी ग्रामीण रुग्णालय येथून मागवण्यातआली. लगेच आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी अवघ्या १२ मिनिटात चारचाकी वाहनाने ती औषध पाठवल्याने रुग्णाला इंजेक्शन देऊन नागपूरला नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकरे हे सतत ठाणेदार अशोक भापकर यांच्या संपर्कात होते. डॉक्टरांनी त्यांचेवर शस्त्रक्रिया सुध्दा केली. उपचार सुर असतानाच तिसऱ्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश बहिरेवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने बहिरेवार परिवारच नाही तर अख्ख्या जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली आहे.