आपला जिल्हा
चिखलणी करताना ट्रक्टर पलटले, सुदैवाने जीवितहानी नाही
चामोर्शी तालुक्यातील भोगनबोडी येथील घटना

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २७ जुलै
धान रोवणीसाठी चिखलणी करतांना ट्रक्टर पलटून चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी चामोर्शी तालुक्यातील भोगनबोडी येथे घडली. संजय बारसागडे रा.भोगनबोडी असे जखमीचे नाव आहे.
जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून चामोर्शी तालुक्यात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. संजय बारसागडे आपल्या ट्रक्टरने भोगनबोडी येथील गव्हारे यांच्या शेतात चिखलणी करीत असतांना अचानक ट्रक्टर पलटले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र संजय बारसागडे यांना किरकोळ जखमा झाल्या. ट्रक्टर पलटी होताच शेतावर असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.