क्राईम स्टोरीविशेष वृतान्त

जंगली डुकरासाठी लावलेल्या वीज प्रवाहाने वाघाचा मृत्यू

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२४ आक्टोंबर 

जंगली डुकरांची शिकार करण्यासाठी विद्युत प्रवाह सोडला; पण यात डुक्कर न अडकता वाघ अडकून त्याची शिकार झाली. ही घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.

गडचिरोली वन विभागांतर्गत येणाऱ्या चातगाव वन क्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. लोकांना या वाघाचे अधूनमधून दर्शन होत होते. अशातच मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास गुराखी गुरे चारत असताना वाघ मृतावस्थेत दिसला. त्याने काही लोकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. वनविभागाचे अधिकारी सकाळी दहा वाजतापर्यंत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनाम्याची कार्यवाही केली. दरम्यान गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. सदर वाघ अंदाजे साडेचार वर्षांचा असून ब्रह्मपुरी वनविभागातून इकडे आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळावरुन वाघाचा मृतदेह गडचिरोली वनविभागाचे डेपोत आणून त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर लगेच त्याचेवर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे व वन विभागाने अधिकारी उपस्थित होते.

तीन पंजे व डोक्याचा काही भाग गायब
करंटने शिकार झालेल्या वाघाचे तीन पंजे तसेच वाघाचा जबडा व डोक्याचा काही भाग गायब झाला आहे. पुढचे दोन्ही पंजे व मागील डावा पंजा अज्ञात लोकांनी गायब केला. प्रथमदर्शनी वाघाला करंट लावून मारल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, यासह विविध बाबी चौकशीनंतरच स्पष्ट होतील. असे गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी म्हटले आहे.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!