आपला जिल्हाविशेष वृतान्त

महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा योग : गोंडवाना विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभाचे राष्ट्रपती करणार बीजभाषण

५ जुलै रोजी राष्ट्रपती , राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे सह मंत्र्याचा ताफा गडचिरोलीत ; विद्यापीठ परिसर नवनिर्माणाची ठेवली जाणार कोनशिला

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.३ जुलै गडचिरोली

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात प्रथमच भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या १० व्या दीक्षांत समारंभाच्या मुख्य अतिथी म्हणून समारंभाचे बीजभाषण अर्थात दीक्षांत भाषण करणार आहेत. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस असतील तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री धर्मराव आत्राम, कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ श्रीराम कावळे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महामहीम राष्ट्रपतींचे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बीजभाषण हा महाराष्ट्रातील कदाचित पहिलाच योग असावा. असे सांगितले जात आहे.

सकाळी १०:३० ते ११:३० या एक तासात कार्यक्रम पूर्ण केला जाणार आहे. यात विशेष प्राविण्य प्राप्त सहा विद्यार्थांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. तर विद्यापीठाच्या नवनिर्माणाधिन परिसराची कोनशिला ऑनलाईन पद्धतीने ठेवली जाणार आहे. सभामंडपात १ हजार अतिथींची बैठक व्यवस्था केली असून यात २०० पोलीस विभागाचे अधिकारी आणि ८०० अतिथी असणार आहेत. अतिथींमध्ये व्ही व्ही आय पी, आणि व्हीआयपी सह विद्यापीठाच्या मोजक्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

गोंडवाना विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने कार्यक्रमाचे मुख्य अतिथी काही महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात विद्यापीठ परिसराठी लागणारा ८८५ कोटींचा प्रारुप आराखड्यास मंजुरी व निधी देण्याची घोषणा यासह गोंडवानाला ट्रायबल आणि फॉरेस्ट युनिव्हर्सिटी म्हणून विधीमंडळाच्या पावसाची अधिवेशनात मंजूरी देण्याची घोषणा केली जाऊ शकते. दीक्षांत समारंभात ३९ सुवर्ण पदकाचे मानकरी, ६२ प्रथम गुणवत्ता प्राप्त आणि २६४ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

अत्यंत कडेकोट बंदोबस्त, चिटपाखरूही फिरू न देण्याची खबरदारी
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळ पासून गोंडवाना विद्यापीठाकडे येणारे सर्व मार्ग सायंकाळपर्यंत बंद करण्यात आले आहेत. जिल्हा न्यायालयातून ते कोटगल पर्यंत दिवसभर निमंत्रित वगळता चिटपाखरूही फिरू न देण्याची खबरदारी घेतली गेली आहे.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!