आपला जिल्हाताज्या घडामोडी

चामोर्शी कृऊबासचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्यासह चार जणांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्याचा विभागीय सहनिबंधकाचा आदेश

आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करणार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० जून 

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्यासह तीन जणांच्या नामनिर्देशन पत्रा संबंधी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हा निबंधकाने दिलेला निर्णय रद्दबातल ठरवित विभागीय सहनिबंधकाने चार जणांचे नामनिर्देशन पत्र रद्द करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत अतुल गण्यारपवार यांच्यासह तीन उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणुन स्वाक्षरी केलेल्यानी एकापेक्षा जास्त नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी केली याविरोधात आक्षेप अर्ज दाखल करण्यात आला. तरी निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हा निबंधक यांनी या या आक्षेप अर्जावर निर्णय देताना तरतुदींचे पालन न करता नामनिर्देशनपत्र कायम ठेवण्यात आले. परंतु या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधकाकडे आक्षेप अर्ज दाखल केले असता त्यांनी जिल्हा निबंधक व निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा पूर्वीचा निर्णय रद्दबातल ठरविल्याने या निवडणूकीत संचालक
म्हणुन निवडून आलेले अतुल गंगाधर गण्यारपवार, अभिजित अरुण बंडावार, सुधाकर पुंडलिक निखाडे, गोसाई सीताराम सातपुते यांचे संचालक पद धोक्यात आले आहे.

याबाबत अतुल गाण्यारपवार यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सदर निर्णय चूकीचा आहे.विभागीय सहनिबंधकांनी राजकीय दबावामुळे असा निर्णय दिला असून या निर्णयाला आपण ऊच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे  त्यांनी सांगितले.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!