काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वातील गडचिरोलीत शेतकरी न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ११ जून
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ हे दिनांक १२ जून रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या नेतृत्वात शेतकरी न्याय यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे.
जाहिरात
या शेतकरी न्याय यात्रेत विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते आ. विजय वड्डेटीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, खा.प्रतिभा धानोरकर, खा .बलवंत वानखेडे, खा. डॉ.प्रशांत पडोले, खा.शामकुमार बर्वे, अखिल भारतीय काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, माजी खा. मारोतराव कोवासे, आ. रामदास मसराम, आ. अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडबाले, निरीक्षक सचिन नाईक , मनोहर पोरेटी यांच्यासह वरिष्ठ नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी बांधव, युवक, महिला, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.