आपला जिल्हाताज्या घडामोडी

वनजमीनीच्या अवैध विक्री प्रकरणी दोन पत्रकारांनी भूमाफिया कडून घेतले पाच लाख रुपये !

कोट्यवधीच्या वनजमिनीची परस्पर विक्री प्रकरणात दोन पत्रकारांची मध्यस्थी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १७  जाने.  

गडचिरोली शहराच्या मध्यवर्ती भागातील वन विभागाच्या १.२० हेक्टर जागेवर लेआऊट करून कोट्यवधींना विक्री केल्या प्रकरणी वनविभागाने कारवाई करीत सदर जागा ताब्यात घेतली असली तरी हे प्रकरण अद्याप निस्तरले नाही. या प्रकरणात गडचिरोली येथील राष्ट्रीय हिंदी दैनिकाचा जिल्हा प्रतिनिधी आणि दुसऱ्या एका हिंदी मराठी दैनिकाचा वाणिज्यिक प्रतिनिधी यांनी भूमाफियाचा दलाल म्हणून काम करण्यासाठी त्याचे कडून पाच लक्ष रुपयांची दलाली घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. वनाधिकाऱ्यांकडून सदर लेआऊट वर कोणतीही कारवाई न होऊ देण्यासाठी ही दलाली घेतल्याचे दिसून येते. उल्लेखनीय आहे की हिंदी मराठी दैनिकाच्या सदर प्रतिनिधीने यापूर्वी सुद्धा एका पोलीसाला अवैध दारू विक्रेत्याकडे जाऊन हप्ता मागितला होता.

गडचिरोली वनपरिक्षेत्र अंतर्गत उजेडात आलेल्या या प्रकरणी ४ आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहराच्या आयटीआय ते गोकुलनगर बायपास मार्गावरील सर्व्हे क्रमांक २१ च्या १.२० हेक्टर जागेवर ले आऊट तयार करून जागेची विक्री केली जात होती. ही जागा वनविभागाची असल्याचे उघड झाल्यानंतरही विक्री सुरूच होती. पत्रकारच या प्रकरणी दलाल म्हणून काम करीत असल्याने भूमाफिया प्लाट विक्री करीत होता आणि वन प्रशासनातील अधिकारी हे कारवाई करीत नव्हते.

मध्यंतरी दलालांनी त्यांचेसह काही वनाधिकाऱ्यांना प्रत्येकी एका प्लाटची मागणी केली. ती मान्य झाली नाही. त्यातून बेबनाव निर्माण झाला. या दलालांनी संबंधित वन अधिकाऱ्याच्या नावावर घेतलेले पैसे सुध्दा त्याला दिले नाहीत. या दरम्यान लोकसत्ताने हे प्रकरण बातम्यांच्या मालिकेतून लोकांपुढे आणले. सदर प्रकरण अंगलटीला येईल या भीतीमुळे वन विभागाने तब्बल ८ महिन्यांच्या दप्तर दिरंगाईनंतर संबंधित ४ आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
वनविभागाच्या कारवाई नंतर प्लाट खरेदीधारकांनी भूमाफिया कडे पैशासाठी तगादा लावला आहे. तर भूमाफियाने, त्याचे काम न झाल्याने सदर दलालांना पैसे परत मागितले.

मागिल आठवड्यात त्यांची या संदर्भात बैठक झाली पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. सदर दलालांनी भूमाफियाला पैसे परत मागितल्यास अन्य प्रकरणात अडकवण्याची धमकी सुध्दा दिली असल्याचे सांगितले जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!