आपला जिल्हा

गडचिरोली पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून स्वयंरोजगार मेळावा शेतकऱ्यांना फवारणी पंपचे वाटप

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १८ ऑगस्ट

जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांकरिता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल, बीओआय स्टार आरसेटी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाचा “स्वयंरोजगार मेळावा” गुरुवारी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे पार पडला. यावेळी शेतकऱ्यांना फवारणी पंपचे वितरण करण्यात आले.

या मेळाव्यास दुर्गम-अतिदुर्गम भागातील १०० प्रशिक्षणार्थी युवक-युवती व शेतकरी उपस्थित होते. मत्स्य व्यवसाय पुर्ण केलेल्या २७ प्रशिक्षणार्थ्यांना ०२ किलो मत्स्य बीज, ०५ किलो मत्स्य खाद्य व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ३४ फवारणी पंप वाटप करण्यात आले. आजपर्यंत स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टट ११४३, हॉस्पीटलीटी ३०५, ऑटोमोबाइल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लम्बग २०, वेल्डींग ३३, जनरल ड्युटी अस्सिस्टंट १०३, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ५२ असे एकूण २५५४ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

तसेच कृषी विज्ञान केंद्र, तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्यूटीपार्लर १०५, मत्स्यपालन ६०, कुक्कुटपालन ४४४, बदक पालन १००, शेळीपालन ८०, शिवणकला १८७, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, टू-व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण ६४, भाजीपाला लागवड ४४०, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ७८०, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ३०, टू/ फोर व्हिलर प्रशिक्षण ३९०, एमएससीआयटी-२०० असे एकूण ३०१२ युवक युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. मल्लीकार्जुन, राहुल दमाले, गडचिरोली कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, बीओआय स्टार आरसेटी चे संचालक चेतन वैद्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धानोरा उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव व पोलीस कर्मचारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!