जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अपंग शाळेत साहित्याचे वाटप व वृक्षारोपण
गडचिरोली तालुका छायाचित्रकार संघटना व माऊली फोटो बुक अल्बम यांचा पुढाकार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १९ ऑगस्ट
छायाचित्रकार बहुद्देशीय संस्था चंद्रपूर, द्वारा संलग्नित गडचिरोली तालुका छायाचित्रकार संघटना व माऊली फोटो बुक अल्बम गडचिरोली च्या वतीने शुक्रवारी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त निवासी अपंग विद्यालय लांझेडा येथे साहित्य वाटप, फळ वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अपंग शाळेचे मुख्याध्यापक यश हर्ष, अधीक्षक डोनाळकर, एस.पी.जोशी,सुनिता रामपूरकर, घनश्याम ठाकूर,मनोज धनगुन, राजू मेटे, निखील सहारे, प्रवीण बांदुरकर, रवी मेश्राम, दर्शन मेश्राम, चेतन सामृतवार,व तसेच गडचिरोली तालुक्यातील सर्व छायाचित्रकार बांधव आणि अपंग शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त गडचिरोली शहरातील जेष्ठ छायाचित्रकार नंदू नागेश्वर, राजू मने, विलास मेटे, सुभाष बांगरे, अविनाश अंडेलकर यांचा सत्कार करण्यात आला.