आपला जिल्हा
गडचिरोलीत उद्या सायकल रॅलीचे आयोजन
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १२ ऑगस्ट
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याचे औचित्य साधुन संपुर्ण देशात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव निमित्याने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या सकाळी ७.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सायकल रॅली ही सकाळी इंदिरा गांधी चौक येथून सुरु होवून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात समारोप होणार आहे. सदर रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच गडचिरोली येथील नागरीक सहभागी होणार आहेत. तसेच इच्छुक नागरिकांनी सायकल सह रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित राहावे असे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.