आपला जिल्हा
गडचिरोली जिल्ह्यात २१ कोरोना बाधित तर ३ कोरोनामुक्त
जिल्ह्यात वाढले कोरोनाचे रुग्ण ; ८० सक्रीय कोरोनाबाधीतांवर उपचार सुरु
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०१ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी ४५६ कोरोना तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २१ नवीन कोरोना बाधिता आढळून आले तर ३ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ८० झाली आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंत ३७७७२ कोरोना बाधितांपैकी ३६९१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण ७७५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.२१ टक्के तर मृत्यू दर २.०५ टक्के झाला आहे.
नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ७, अहेरी ३, आरमोरी १, चामोर्शी ६, धानोरा २, कुरखेडा २ जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २ व चामोर्शी १ जणाचा समावेश आहे.