आपला जिल्हाविशेष वृतान्त

नक्षल्यांचा शहीद सप्ताह गुरुवारपासून ; गडचिरोली परिक्षेत्रात हाय अलर्ट

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ जुलै

गुरुवार पासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरु होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगढमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. २८ जुलै ते ३ ॲागस्ट या काळातील शहीद सप्ताहादरम्यान नक्षलवादी घातपात करण्याची दाट शक्यता असते, त्यामुळेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढ पोलीसांनी अलर्ट जारी केला आहे. शहीद सप्ताहा दरम्यान नक्षलवादी कारवायांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलसांनी ॲापरेशन सुरु केले आहे. या अंतर्गत गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पोलीसांची गस्त वाढवण्यात आली असून, जंगलांमध्ये सी–६० चे जवान अलर्टवर आहेत.

चारू मुजुमदार आणि कन्हैया चॅटर्जी यांच्या शहादतीच्या पार्श्वभूमीवर २८ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान सुरू झालेला शहीद सप्ताह भाकपा माओवादी संपूर्ण देशभर साजरा करतात. दरम्यान नक्षलप्रभावित क्षेत्रात बंदचे आवाहन, शहीद स्मारक उभारून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे, नक्षल्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी घातपात घडवून आणणे, पोलीस आणि सरकारांचा निषेध करणारे बॅनर लावणे अशी कार्य प्रणाली असते. शहीद सप्ताहात नलक्षवादी आयडीचा ब्लास्ट करुन पोलिसांच्या जीवाला धोका पोहोचवतात. पोलिस जंगलात गस्तीसाठी जातात त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करणे, अशा पद्धतीची त्यांची रणनीती असते. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना काऊन्टर करण्यासाठी उपाययोजना आखलेल्या आहेत. हा तीव्र पावसाचा काळ असल्याने जंगलातून वाट काढत नक्षली कारवायांना तडीस नेणे कठीण असते. त्यामुळे टी.सी.ओ.सी. अर्थात टॅक्टीकल काउंटर ऑफेंसिव कॅम्पेन या रणनीतीचा प्रामुख्याने वापर करून वातावरण निर्मिती करतांना प्रत्यक्ष कारवायांना ऐनवेळी स्थगित करणे अशा प्रकारच्या युद्धनीतीचा नक्षली वापर करताना आढळून आले आहेत.

शहीद सप्ताह म्हणजे काय?

शहीद सप्ताह हा नक्षलवाद्यांचा वर्षातला सगळ्यात मोठा सप्ताह असतो. ज्या ठिकाणी पोलिसांकडून नक्षल मारले गेलेले आहेत, त्या ठिकाणी स्मारक वगैरे बांधणे, असे प्रकार नक्षली करत असतात, त्याचबरोबर पोलिसांवर हल्ले करण्याचे त्यांचे उदिष्ट असते.

मागील काही वर्षापासून सशस्त्र नक्षल चळवळ माघारली असल्यामुळे अतिदुर्गम भामरागड, कोरची, एटापल्ली, धानोरा तालुक्यांमध्ये अंशतः प्रभाव आढळून आला होता. १३ नोव्हेंबर रोजी मर्दीनटोला चकमकीत नक्षल चळवळीचा महाराष्ट्रातील मोठा नेता आणि महाराष्ट्र सचिव सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे सह २७ नक्षल्यांना पोलिसांकडून कंठस्नान घातल्या गेल्यामुळे आणि मोठ्या संख्येने आत्मसमर्पण व अटक झाल्यामुळे यंदाचा नक्षली शहीद सप्ताह प्रभावहीन ठरण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी मिलिंद तेलतुंबडे आणि सहकाऱ्यांच्या मृत्युनिमित्य शहीद स्मारके उभारण्याचा निश्चित प्रयत्न होईल. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने सुध्दा पर्यायी रणनीती आखली असून दोन दिवसांपूर्वीपासूनच नक्षल प्रभावित क्षेत्रासह जिल्ह्यात बॅनर्स लावून जनजागरण अभियान आणि नक्षलविरोधी शोध अभियान सुरु केले आहे.

कोणत्याही कारवाईला सडेतोड प्रत्त्युत्तर देण्यास पोलिस तयार

गेल्या काही काळात नक्षलवादाचा बिमोड करण्यास गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य चांगले आहे. गडचिरोली पोलिस नक्षलींच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड प्रत्त्युत्तर देण्यास तयार आहेत. परंतु मर्दीनटोला चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे सह त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणावर मारले गेले त्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी हिंसक कारवाया करु शकतात. हे लक्षात घेऊन गडचिरोली परिक्षेत्रात रणनीती आखली गेली आहे. आवश्यकतेनुसार महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा पोलीसांचेही संयुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या मालमत्ता आणि जिवीतहानी होऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. जनजागरण अभियान प्रसार सुरू केला आहे.

संदीप पाटील
पोलीस उपमहानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान गडचिरोली परिक्षेत्र
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!