केंद्र सरकारच्या निषेधात जिल्हा कॉंग्रेसचे भर पावसात आंदोलन
सोनिया गांधी यांच्यावरील ईडी चौकशीचे केला निषेध

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ जुलै
केंद्रातील भाजप सरकारने आपल्या अधिकारांचा गैरवापर करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडी ची नोटीस बजावली असून ईडी भाजप सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत आहे. त्यामुळे या कारवाईच्या निषेधात जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. पाऊस सुरु असतांनाही काँग्रेसने हे आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध केला.
केंद्रातील मोदी सरकार दडपशाही धोरण राबवित असून महागाई, बेरोजगारी तसेच देशातील अनेक समस्यांना घेऊन प्रश्न विचारणार्यांवर ईडीची चौकशी करून आवाज दडपण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र काँग्रेस अशा चौकशांना घाबरत नसून नेत्यांना आणखी नाहक त्रास दिल्यास यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान यांनी दिला. यावेळी प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतिश विधाते, अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष रमेश चौधरी, ओबीसी विभाग अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, दामदेव मंडलवार, पुष्पलता कुमरे, शामराव चापले, विनोद लेनगुरे, घनश्याम वाढई, हरबाजी मोरे, सुनील चडगुलवार, दिवाकर निसार, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, जितेंद्र मुनघाटे, सुभाष धाइत, राकेश रत्नावार, संजय मेश्राम, राजू रणदिवे, भैयाजी मुद्दमवार, परशुराम गेडाम, संतोष चौधरी, मुकुंदा बावणे, अमित गावतुरे, नितेश निकुरे, मनोहर गेडाम, दामोदर गावतुरे, वामन मानकर, गुणाजी राऊत, योगाजी राऊत, अब्दुल पंजवाणी, भारत येरने, कृष्णा झंजाळ, हंसराज उराडे, सदाशीव कोडापे, आशिष कामडी, जीवनदास मेश्राम, राकेश रत्नावार, मिलिंद बारसागडे, आय.बी. शेख, दीपक रामने, अरुण पुण्यपरेड्डीवार, सुखदेव वासनिक, चारुदत्त पोहणे, बाळासाहेब आखाडे, सुधीर बांबोळे, जावेद खान, विमल पुगांटी, बेबीताई कुमरे सह मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.