आपला जिल्हा

गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश 

निशुल्क प्रवेश देणारे राज्यातील पहिले विद्यापीठ

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०२ ऑगस्ट

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून क्षमतेला शिक्षण आणि रोजगाराची जोड देण्याची गरज आहे. मात्र, आर्थिक परिस्थीतीमुळे काही विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत. व शिक्षणापासून वंचित राहतात. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेऊन भविष्य उज्ज्वल करता यावे यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षा करीता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षा च्या प्रवेशाकरीता निशुल्क प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोंंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले, हे विशेष.

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तालुक्यातील अतीदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी संपर्क अभियान सुरू केले असून प्राध्यापक स्वतः या भागात फिरून विद्यार्थ्यांना माहिती देतात. यांसह विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली बसस्थानक ते गोंडवाना विद्यापीठापर्यंत प्रवासासाठी बसची सुविधाही करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये मोफत प्रवेश तसेच क्रांतिविर बाबुराव शेडमाके कमवा आणि शिका योजने अंतर्गत त्यांना आर्थिक मदत होणार आहे. वसतिगृहात अधिक विद्यार्थी समावून घेण्यासाठी विद्यापीठाने शासकीय विज्ञान महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाचे वस्तीगृह घेण्याचे ठरवले आहे .तेथून विद्यापीठात येण्याची व जाण्याची निशुल्क सोय विद्यापीठ करीत आहे.

विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट ला अधिकाअधिक महत्व देत स्वंय रोजगाराचे प्रशिक्षण दिल्या जाते आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठापर्यंत येण्यास त्रास होऊ नये यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रवेशाकरिता विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहे तसेच विद्यार्थी सुविधा केंद्र शंकरराव बेझलवार आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालय ,अहेरी आणि शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय तुकुम, चंद्रपूर येथे नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!