पुराचे पाणी गोट फार्ममध्ये शिरल्याने १६ बकऱ्यांचा मृत्यू

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि १६ जुलै
चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून राजुरा तालुक्यातील बामणी-राजुरा मार्गालगत असलेल्या एका गोटफॉर्म मध्ये पुराचे पाणी शिरल्याने १६ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर गोटफॉर्म मोहम्मद शब्बीर यांच्या मालकीचे असून त्यांचे मोठे नुकसान झाले.
मोहम्मद शब्बीर यांनी बामणी राजुरा मार्गालगत असलेल्या आपल्या शेतात गोटफॉर्म स्थापन केला असुन या ठिकाणी २७ बकऱ्या होत्या. सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता व नदीनाल्यांच्या पाण्याची पातळी वाढत होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहम्मद शब्बीर यांना बकऱ्या स्थलांतरित करण्याचे सूचना देऊनही आपले शेत उंचावर असल्याने पुराचे पाणी आपल्या शेतात येणार नाही या भ्रमाने शब्बीर यांनी बकऱ्या स्थलांतरित केल्या नाही. मात्र अचानक पुराचे पाणी वाढले आणि गोट फॉर्म मध्ये शिरले. तेव्हा मोहम्मद शब्बीर हे स्वतःचा जीव वाचवित नजीकच्या साई मंदिर येथे आश्रय घेतला. पाण्याची पातळीमध्ये वाढ झाल्याने १६ बकऱ्यांचा मृत्यू झाला तर उर्वरित १२ बकऱ्या जिवंत वाचल्या. पुराचे पाणी ओसरल्यानंतर तहसीलदार हरीश गाडे, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, तलाठी विल्सन नांदेकर, पशुवैद्यकीय अधिकारी जिल्हेवार, आक्रोश जुलमे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात शेळी मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.