पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १८ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी ४६९ कोरोना तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. यात १२ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर १० कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या ८४ झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३८००७ कोरोनाबाधितांपैकी ३७१४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत ७७७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७३ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.२२ टक्के तर मृत्यू दर २.०४ टक्के झाला आहे.
कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २, अहेरी १, चामोर्शी ४, कुरखेडा १ व धानोरा २ जणाचा समावेश आहे. तर आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३, चामोर्शी ३, धानोरा २, मुलचेरा १, व कोरची ३ जणाचा समावेश आहे.