ॲड. दुष्यंत नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त मॅराथॉन व विशेष करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १२ सप्टेंबर
ॲड. दुष्यंत नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त छात्रो की गूंज कार्यक्रमांतर्गत दौड आरोग्याची, जल्लोष तरुणाईचा हा उत्सव आयोजित केला आहे. मॅराथॉन स्पर्धा रविवार १३ सप्टेंबर ला सकाळी ६.०० वाजता शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली येथून सुरू होईल. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांना टी शर्ट वितरीत केले जाणार आहेत आणि विजेत्यांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहेत. या सोहळ्यात ऍड. दुष्यंत नामदेव किरसान मित्र परिवार काँग्रेस पक्ष व गुरुकुल करिअर अकॅडमी, गडचिरोली यांचा सहभाग असणार आहे.
तर दुसऱ्या एका सोहळ्यामध्ये प्रा. डॉ. विनोद बाबर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, शासकीय व खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी तसेच भविष्यातील करिअर निवडीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.
रविवार दि . १३ सप्टेंबर २०२६ ला सकाळी ११:०० वाजता आर. के. सेलिब्रेशन हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक भविष्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या मार्गदर्शन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन ॲड. दुष्यंत नामदेव किरसान मित्र परिवार, गडचिरोली यांनी केले आहे.


