विशेष वृतान्त

गडचिरोलीवर शोककळा : आंघोळीसाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सती नदीत बुडून मृत्यू

एक विद्यार्थी बचावला, कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथील घटना, शोध पथकाची कारवाई सुरू

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १ ऑगस्ट 

कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे शनिवार आई-वडील धान रोवणीच्या कामासाठी शेतात गेले असताना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडेगाव येथील चार विद्यार्थी जवळील सती नदीत आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी सुदैवाने बचावला. ही दुर्घटना दुपारी १२.३० ते १.०० वाजताच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच शोध पथक तसेच पुराडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली. या दुर्घटनेत मृत्यू  झालेल्यांमध्ये लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (वय ६ वर्षे), कुणाल रमेश दूधकवर (वय ५ वर्षे), मोहित हिवराज सराटे (वय ११ वर्षे)यांचा समावेश आहे. तिनही विद्यार्थी कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथील रहिवासी असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेडेगाव येथे शिक्षण घेत होते. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास खेडेगाव येथील सती नदीच्या पात्रात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!