विशेष वृतान्त
खनिज उत्खननासाठी सर्वेक्षण, ग्रामसभांच्या एन ओ सी साठी एका कंपनीकडून साम दाम दंड भेदाचा वापर? वेलमागड येथे एन ओ सी संबंधित ग्रामसभांची बैठक सुरू ! अशा कृतीने ग्रामसभांच्या विश्वसनीयतेला तडा जाऊ शकतो?
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ७ ऑगस्ट
एटापल्ली तालुक्यातील वेलमागड येथे शुक्रवारी १२ वाजता पासून खनिज उत्खननासाठी सर्वेक्षण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्रामसभांच्या एन ओ सी साठी एक बैठक सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत एक इच्छुक कंपनी साम दाम दंड भेद रणनीती वापरुन ग्रामसभांच्या एन ओ सी मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते. कंपनीच्या या अमिषाला काही ग्रामसभांचे लोक बळी पडले असल्याचे समोर आले असल्याने ग्रामसभांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची संभावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या बैठकीत वेलमागड भागातील ग्रामसभा सदर कंपनीला एन ओ सी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतात काय? याकडे गडचिरोली जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.


