विशेष वृतान्त

लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २६ जुलै 

लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या शालेय सहाय्यता कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल, कोणसरी येथे मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमाअंतर्गत इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी आणि १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ८३ विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाला बळकटी देणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूल, कोणसरीचे मुख्याध्यापक मा. कोहाडे सर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून  लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे  प्रशासन विभागप्रमुख वेणूगोपाल यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाची गरज याविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!