विशेष वृतान्त

विमानतळाचा प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी हिरापूर- गुरवळा येथील नागरिकांचा विद्यार्थ्यांसह पहील्याच दिवशी शाळेवर बहिष्कार

गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सवाला गालबोट

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.३० जून 

एकीकडे राज्यभरात शाळा प्रवेशोत्सव सुरू असताना, गडचिरोली तालुक्यातील हिरापूर,राखी,गुरवळा या परिसरातील प्रस्तावित विमानतळाचा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी हिरापूर आणि गुरवळा या गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांसह मंगळवारी गावातील शाळेसमोर आंदोलन करीत पहिल्याच दिवशी प्रवेशावर बहिष्कार घातला. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सवला एकीकडे गालबोट लागले तर दुसरीकडे विमानतळासाठी आपल्या सुपीक जमिनी सरकारला न देण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिकांची एकजूट आणि प्रखर विरोध समोर आला आहे. 

विमानतळासाठी काढलेला शासनाचा जीआर रद्द करा, अन्यथा आम्ही शाळेत जाणार नाही. अशी ठाम भूमिका घेत हिरापूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत न जाण्याचा निर्णय घेत शाळेच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन केले. गुरवळा-हिरापूर येथील प्रस्तावित विमानतळासाठी शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

उल्लेखनीय आहे की, गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनविण्याच्या नावाखाली शासनाकडून मोठ्या प्रमाणावर सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. शेतजमिनी गेल्यास अनेक शेतकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत अनेक आंदोलनं झालीत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनाही शेतजमिन अधिग्रहनाचा आदेश रद्द करण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.

गडचिरोली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या ठिय्या आंदोलनात सह पालकमंत्री यांनी अधिग्रहणाच्या विषयाला स्थगिती देत असल्याचे आश्वासन दिले. मात्र नुकतेच विमानतळासाठी आवश्यक वनभूमी व इतर जमीनींच्या अधिग्रहणाच्या पुढील कार्यवाहीसाठी एजंसी नेमण्यात संदर्भात नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झाली. आणि पुन्हा एकदा नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!