विशेष वृतान्त

नाराजी नाट्याच्या अल्टीमेटमच्या पार्श्वभूमीवर नवे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचा २६ मे रोजी पदग्रहण सोहळा

गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणातील लक्षवेधी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २४ मे 

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी आदिवासी नेते विश्वजित कोवासे यांचा नियुक्तीने जिल्हा काँग्रेस मध्ये व्यापक प्रतिक्रिया उमटल्या असुन प्रचंड मोठे नाराजी नाट्य सुरू आहे. नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील १२ तालुकाध्यक्ष आणि काही पदाधिकाऱ्यांनी ४ दिवसांत निर्णय मागे घ्या, अन्यथा सामुहिक राजीनामे देऊ. असा अल्टीमेटम दिला आहे.  येत्या २६ मे रोजी या अल्टीमेटमला ४ दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नेमके त्याच दिवशी नवे जिल्हा अध्यक्ष म्हणून विश्वजीत कोवासे यांचा शक्ती प्रदर्शनासहीत पदग्रहण सोहळा आयोजित केला आहे. याला जिल्ह्यातील राजकारणात एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

२६ मे, मंगळवारी गडचिरोली शहरातील सुरेश पोरेड्डीवार यांचे घरासमोरील मोठ्या प्रांगणात सायंकाळी ४ वाजता विश्वजित कोवासे यांचा कांग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून पदग्रहण सोहळा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून कांग्रेस चे विधानसभा गटनेते आमदार विजय वडेट्टीवार हे असणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून   भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानु चिब, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, मारोतराव कोवासे माजी खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र, शिवराज मोरे प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र युवक काँग्रेस, रामदासजी मसराम आमदार, आरमोरी, अँड. अभिजीत वंजारी आमदार, विधान परिषद, सुधाकरजी अडबाले आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी,  आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री वसंत पुरके, संजय ठाकरे , प्रदेशाध्यक्ष पंचायत राज, नवज्योत सिंग सिंधु प्रभारी युवक काँग्रेस महाराष्ट्र, महेंद्र ब्राह्मणवाडे माजी अध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी,  अजय चिकारा राष्ट्रीय महासचिव, भारतीय युवक काँग्रेस तथा महाराष्ट्र प्रभारी एनएसयुआय, प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव रविंद्र दरेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, अजय कंकडालवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पंकज गुड्डेवार, जिल्हा परिषद चे माजी सदस्य राम मेश्राम, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य पदग्रहण तथा शेतकरी मेळावा होणार आहे. तरी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे  कार्यकर्ते पदाधिकारी, सर्व प्रदेश पदाधिकारी,  युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, व सर्व फ्रंटलचे पदाधिकारी   बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे  असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!